रा .कृ .पाटकर हायस्कूल वेंगुर्ले मध्ये ‘वन दिन’ आणि “हवामान दिन’ साजरा…

वेंगुर्ला l प्रतिनिधी :वेंगुर्ला येथील रा .कृ. पाटकर हायस्कूल वेंगुर्ले या प्रशालेमध्ये सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग यांच्यावतीने राष्ट्रीय हरित सेना विभागामार्फत वन दिन व हवामान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय हरित सेना शिक्षक श्री समीर जनार्दन पेडणेकर, वेंगुर्ला विभाग वनपाल श्री बागुल साहेब, मुख्याध्यापक श्री आत्माराम सोकटे सर, श्री महेश बोवलेकर सर तसेच अन्य सहाय्यक शिक्षक उपस्थित होते. कलाशिक्षक तथा हरी सेनाशिक्षक श्री समीर पेडणेकर सर यांनी निसर्गात राहून चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली व बक्षिसे प्रदान करण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक दूर्वा महेश गावडे, द्वितीय क्रमांक रीशिता संदीप बोवलेकर, तृतीय क्रमांक मनस्वी रमेश पाटकर,उत्तेजनार्थ वैष्णवी नारायण पडवळ, संस्कार हेमंत शारबिद्रे या विद्यार्थ्यांना बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिक्षक पेडणेकर सर, सौ एम एम खरात, एम एस बोवलेकर श्रीमती मांजरेकर यु एन ,

सौ मुनकर एस एस, श्री पोटफोडे एस पी .आदी शिक्षक व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच अन्य सहाय्यक शिक्षक व शिक्षिकेचे कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.