केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे शनिवारी राजापुरात

 

भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी साधणार संवाद 

राजापूर (प्रतिनिधी) केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे हे शनिवारी ६ एप्रिल रोजी राजापूर दौऱ्यावर येत आहेत. याप्रसंगी ना. राणे हे राजापूर तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्याशी संवाद साधरणार आहेत.

देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपा पक्षाकडून केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमिवर ना. राणे हे राजापूरात येत असल्याने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

शनिवारी ६ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता साई विमलेश्वर मंगल कार्यालय ओणी, राजापूर येथे ना. राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजापूर तालुक्यातील सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात ना. राणे मार्गदर्शन करणार आहेत. राजापूर तालुका दौऱ्यावर येणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे राजापूर तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वतीने जल्लोषात स्वागत केले जाणार आहे.

याप्रसंगी भाजपाचे सर्व कार्यकर्ते, बेसिक आणि सर्व मोर्चे पदाधिकारी तसेच बुथ अध्यक्ष, सह बूथ अध्यक्ष, लोकप्रतिनिधी , शक्तीकेंद्र प्रमुख, सुपर वॉरीर्यस यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपाचे तालुका अध्यक्ष सुरेश गुरव व भास्कर सुतार यांनी केले आहे. ना. राणे यांच्या या मेळाव्याची तयारी भाजपाकडून हाती घेण्यात आली आहे.