रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर युवा नेते विशाल परब यांची मुस्लिम बांधवांना भेट

सावंतवाडी । प्रतिनिधी : मुस्लिम बांधवांचा महत्वाचा सण असलेल्या रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर युवा उद्योजक विशाल परब यांनी मुस्लिम बांधवांना भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी शीर खुर्म्याचे साहित्य वाटप केले. मुस्लिम बांधवांच्या सुखदुःखात नेहमी आम्ही सोबत राहू, असा विश्वास विशाल परब यांनी दिला. याप्रसंगी माजी नगरसेवक राजू बेग, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, अमित परब, केतन आजगावकर, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.