मंडणगडः प्रतिनिधी : मंडणगड तालुक्यातील मौजे पिंपळोली गुरववाडी येथे बेकायदेशिरपणे देशी दारु विक्रीसाठी बाळगणार्या विरोधात मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार 8 एप्रिल रोजी सायंकाळी 4.15 वा. करण्यात आली.
धोंडू रामजी पारदुले (77,रा. पाचरळ मंडणगड,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी तो आपल्या ताब्यात 840 रुपयांच्या देशी दारुच्या 12 बाटल्या विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असाताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











