मंडणगड l प्रतिनिधी : दि. १० – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट ) या पक्षाच्या मंडणगड तालुका युवक अध्यक्षपदी धीरज कदम यांची नियुक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. नुकतेच चिपळूण येथील पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून धीरज कदम यांना युवक अध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याचे नियुक्तपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी माजी आमदार रमेश कदम, खासदार विनायक राऊत, जिल्हाध्यक्ष सुरेश बने, युवा नेते व उद्योजक प्रशांत यादव, युवक जिल्हाध्यक्ष नौसिन काझी, मंडणगड तालुका अध्यक्ष सुभाष सापटे, माजी पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर, शहराध्यक्ष राहुल कोकाटे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व माजी आमदार रमेशभाई कदम यांनी विशेष अभिनंदन करत युवा वर्गाला हाताशी घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जोमाने कामाला लागा अशी सूचना धिरज कदम देत त्यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या. निवडीबद्दल धीरज कदम यांचे मंडणगड तालुक्यातून अभिनंदन होत आहे.












