Chiplun-Karad railway project question. Shekhar Nikam drew the attention of the government
चिपळूण | प्रतिनिधी : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार शेखर निकम यांनी बुधवारी चिपळूण कराड रेल्वे प्रकल्पाबाबत सरकारचे लक्ष वेधले. हा प्रकल्प मार्गी लागावा, यासाठी सरकार सकारात्मक आहे. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्रीं ना. एकनाथ शिंदे दिल्लीत रेल्वेमंत्री यांची भेट घेतील, अशी माहिती सरकारच्या वतीने मंत्री ना. दादा भुसे यांनी दिली.
कोकणात आजवर अनेक प्रकल्प आले. परंतु त्याला गती दिली जात नाही. मुंबई गोवा महामार्गाचे कामही अनेक वर्षांपासून रखडले आहे. कोकणातील योजना केवळ कागदावरच राहतात, असे आमदार निकम म्हणाले.
मधु दंडवते आणि खा. शरद पवार यांच्या प्रयत्नातून कोकण रेल्वे आली. चिपळूण कराड हा रेल्वे चिपळूणवासींयांच्या अस्मितेचा विषय आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले आहे. अमृत योजनेअंतर्गत राज्यातील रेल्वे मार्गाचा विकास केला जाणार आहे. या योजनेतून चिपळूण – कराड रेल्वेसाठी प्रस्ताव पाठवला जाईल का ? असा प्रश्न निकम यांनी अधिवेशनात उपस्थित केला. त्यावर हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी सरकार सकारात्मक आहे. अगदीच आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे राज्याच्या वतीने पाठपुरावा करतील, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली.