पाणी साठ्याबाबत दिल्या सूचना
माखजन |वार्ताहर :संगमेश्वर – तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडी नळपाणी योजनेच्या कामाची रत्नागिरी जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पूजार यांनी नुकतीच पाहणी केली यावेळी त्यांनी येडगेवाडी येथील योजनेसाठी खोदलेल्या विहीरीची पाणी पातळी पाहीली तर प्रस्तावीत पाचांचे गायकवाडवाडी येथील विहीरीच्या जागेची व जिल्हा परीषद मालकीच्या विहीरीचीहि पाहणी करुन पाणी पातळी तपासण्याचे आदेश या पाहणी दौ-यात त्यांनी दिले तसेच नविन विहीरचे खोदकाम झालेल्या विहीरींची पाणी उत्पन्न क्षमता संदर्भात पाणी पुरवठा अधिका-यांना सूचना दिल्या. एप्रिल अखेरपर्यंत सर्व तपासण्या पुर्ण करुन तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना या पाहणी दौ-यावेळी दिल्या.संगमेश्वर ( देवरुख ) पाणी पुरवठा उप अभियंता अविनाश जाधव यांनी दि.२९ मार्च २०२४ रोजी येडगेवाडी नळपाणी योजना कामातील विहीरीची टेस्ट घेतलेली आहेत या टेस्टमध्ये दिवसाला ३५०० लिटर पाणी उपलब्ध होत असल्याचा अहवाल कनिष्ठ भुवैज्ञानिक यांना सादर केलेला आहे. येडगेवाडीची दररोज ची पाण्याची मागणी ६३००० लिटर एवढी असताना दिवसाला ३५०० लिटर पाणी पुरेसे नसल्याचा अहवाल देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमिवर रत्नागिरी जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पूजार यांनी पाहणी केल्याने पुन्हा होणाऱ्या टेस्ट मध्ये किती पाणी साठा उपलब्ध होतो याची उत्सुकता येडगेवाडीकरांमध्ये आहे.
रत्नागिरी जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. किर्ती किरण पुजार यांनी आज दि. ५ एप्रिल रोजी केलेल्या येडगेवाडी नळपाणी योजना पाहणी दौ-याच्या वेळी गायकवाडवाडी येथील विहीरीच्या जागेची पाहणी केली. यावेळी जिल्हा परीषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राहूल देसाई, खरी लोकजागृती मुख्य संपादक श्री. संतोष येडगे, पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता सौ.मयुरी पाटील, संगमेश्वर ( देवरुख ) पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री.भरत चौगुले, संगमेश्वर ( देवरुख ) पाणी पुरवठा शाखा अभियंता आर.एल. लठाड ,राजिवली ग्रामपंचायत सदस्य श्री. रमेश येडगे, राजिवली पोलिस पाटील श्री. संदीप कदम, राजिवली ग्रामपंचायत ग्रामसेवक श्री.सुनिल जाधव, नळपाणी योजना ठेकेदार श्री. प्रमोद महाडिक आणि येडगेवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.











