पोलिस भरतीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत १५ ते १७ पर्यंत भरती पूर्व मार्गदर्शन 

महेंद्रा अ‍कॅडमीतर्फे कार्यशाळेचे आयोजन

सावंतवाडी । प्रतिनिधी : राज्यात नव्याने होणार्‍या पोलिस भरतीच्या पार्श्वभूमीवर महेंद्रा अकॅडमीच्या १५ ते १७ एप्रिल या कालावधीत सावंतवाडीत मोफत  कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तज्ञ प्रशिक्षकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे.

राज्यभरात १८४७१ पदांसाठी जी पोलीस भरती होत आहे त्याकरिता लागणारे ग्राउंड व लेखी परिक्षेची तयारी कशी करायची त्याचे योग्यरीत्या मार्गदर्शन करण्यात येणार आहे . या कार्यशाळेत सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांपैकी पहिल्या ३ विद्यार्थ्यांना पोलिस भरती होईपर्यंत मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे

जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घ्यावा, असे आवाहन अ‍कॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांनी केले आहे. राज्यात नव्याने १८४७१ पोलिसांची भरती लवकरच होणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

त्यामुळे जास्तीत-जास्त विद्यार्थ्यानी या कार्यशाळेत भाग घ्यावा तसेच १३ एप्रिलपर्यंत नाव नोंदणी स्विकारली जाईल, असे पेडणेकर यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी ९०२२६८६९४४ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.