सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिह्यातील परीक्षार्थींसाठी ज्ञानसिंधू प्रबोधिनी सावंतवाडीच्या वतीने एक आठवडा मोफत पोलीस भरती मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले आहे, या शिबीराची सुरुवात दि. १३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता होणार आहे. या शिबीरसाठी नावनोंदणीसाठी 9422641309 / 9309139284 या नंबर वर संपर्क साधावा.
सहभागी विद्यार्थ्यांना ज्ञानसिंधू प्रबोधिनी कडून एक पुस्तक मोफत मिळेल,तसेच मैदानी चाचणी व लेखी अभ्यासक्रमाचा संपूर्ण आढावा घेतला जाईल.
यासाठी जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी पोलीस भरती मार्गदर्शन शिबीरात सहभागी व्हावे तसेच सवलतीच्या दरात पोलीस भरती पुस्तक प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन ज्ञानसिंधु प्रबोधिनी, सावंतवाडीच्यावतीने करण्यात आले आहे.











