लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील आगवे येथे सोमवार दिनांक १५ एप्रिल ते बुधवार दिनांक १७ एप्रिल या कालावधीत श्रीराम नवमी व चंडिका देवी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
आगवे गुरववाडी येथे भव्य श्रीराम मंदिर उभारण्यात आले असून त्या निमित्ताने सोमवार दिनांक १५ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ मूर्ती प्रतिष्ठापना, सायंकाळी ७ वाजता आरती ,रात्री ८ वाजता भजन व हरिपाठ विठ्ठल रुक्मिणी भजन मंडळ दोन आंबा कोट. मंगळवार दिनांक १६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता आरती आणि रात्री १० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत .बुधवार दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता अभिषेक, दुपारी १२ वाजता राम जन्मोत्सव, दुपारी १ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी २ ते रात्री ९ महाप्रसाद, दुपारी तीन वाजता महिलांचा हळदीकुंकू समारंभ आणि सायंकाळी ७ वाजता आरती असे कार्यक्रम होणार आहेत. रात्र १० वाजता श्री सोमेश्वर सोळजाई नाट्य नमन मंडळ आंगवली देवरुख यांचे नमनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आगवे गुरववाडी ग्रामस्थ, महिला मंडळ ,मुंबई मंडळ सर्व पदाधिकारी मेहनत घेत आहेत










