खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील सवेणी येथील प्रशांत मित्र परिवार यांच्यावतीने कै.प्रशांत चंद्रशेखर गुजर यांच्या स्मरणार्थ १९ ते २१ एप्रिल या कालावधीत श्रीराम मंदिर येथील क्रीडागंणात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील विजेत्यास ११,१११ रूपये, उपविजेत्यास ७,७७७ रूपये, तृतीय क्रमांकास ५,५५५ रूपये व चषक देवून गौरवण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट मालिकावीर यांनाही गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी- व्हावे, असे सुशांत गुजर, सुरज पवार, स्वप्निल गुजर यांनी कळवले आहे.









