खचलेला निळवणे-कातळवाडी रस्ता धोकादायक

एक वर्ष उलटूनही डागडुजी नाही, ग्रामस्थांना पायवाटेचा आधार, संपर्क तुटण्याची भीती

खेड (प्रतिनिधी) गतवर्षी झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीत निळवणे-कातळवाडी रस्ता पूर्णतः खचून मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. अजूनही -रस्त्याची डागडुजी करण्याची तसदी घेण्यात आलेली नाही. सद्यस्थितीत ग्रामस्थ पायवाटेवरूनच पायपीट करत आहेत. पावसाळ्यात पायवाटही बंद होवून ग्रामस्थांचा संपर्क तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने ही बाब गांभीयनि घेवून तातडीने रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी करण्यात येत

गतवर्षी सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीत मार्गस्थ होण्यास अडसर निर्माण निळवणे-कातळवाडी रस्ता खचला झाला होता. सद्यस्थितीत मार्ग होता. एसटी बसेससह अन्य वाहने धोकादायक स्थितीत असून वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

 

मार्गाची दैना उडालेली असतानाही अजूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पायवाट बंद होण्याच्या शक्यतेने ग्रामस्थांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल होणार असून रुग्णांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने मार्गाच्या डागडुजीसाठी त्वरीत पुढाकार घेवून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.