दापोली शिक्षण विभागामार्फत विविध स्पर्धां कलाजथ्याद्वारे मतदानाची जनजागृती

दापोली l प्रतिनिधी: सध्या निवडणुकीची धामधुम सुरु आहे. मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी स्विप अंतर्गत दापोली पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत ३२ रायगड लोकसभा मतदार संघामधील २६३दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये ७ मे रोजी होणाऱ्या मतदान कार्यक्रमाची जनजागृती विविध स्पर्धांद्वारे करणेत येत असून

मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असून त्याचे भान नागरीकांना रहावे, मतदानाच्या दिवशी सर्व नागरीकांनी मतदान करावे व आपला हक्क आणि कर्तव्य बजावावे असे दि. १ एप्रील रोजी प्रभातफेरी काढून तालुक्यातील २०५३६ विध्यार्थी,९९६ शिक्षक तर ५२० इतर लोकांनी,तर दि.३एप्रिल रोजी चित्रकलेद्वारे पहिली ते पाचवीचे ९३२३ पैकी६४१२;आणि सहावी ते बारावी १३२१३पैकी ६३२६ विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवून तसेच दि.८एप्रील रोजी संपन्न झालेल्या निबंध स्पर्धेत इ.पाचवी ते बारावी पर्यंतच्या १४९२८ पैकी८४३६ विद्यार्थ्यांनी,मतदान राष्ट्रीय कर्तव्य,मतदान आपला हक्क,मतदानाचे महत्व,मतदान माझा अधिकार,लोकशाही आणि मतदानाचे महत्व या विषयावर उत्कृष्ठ निबंध लेखन स्पर्धेत सहभाग घेतला आणि आज दि.१० एप्रील रोजी तालुक्यातील ९९६ शिक्षकांनी १८५४६ विद्यार्थी आणि ५१० इतरांचे किमान दोन तास चुनावी पाठशाला अंतर्गत लोकशाही निवडणूक प्रक्रीयेबाबत प्रबोधन केले. तर याच विषयावर पालकास पत्र हा दि.१२ रोजी तर घोषवाक्ये मतदान जाणीव जागृती घोषवाक्ये स्पर्धा दि.१५ रोजी घेण्यात येणार असून,१६ एप्रील रंगावली स्पर्धा होणार असल्याचे नोडल आॅफीसर अन्नासाहेब बळवंतराव यांनी सांगितले आहे.

तसेच नमन,भारुड,या लोककलेमधील गवळण व वग या माध्यमातून

मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदरसिंह, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मतदान जनजागृती मोहिमेचे जिल्हा नोडल अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डाॅ,अजित थोरबले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अर्चना बोंबे,गटशिक्षणाधिकारी तथा स्विप नोडल अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव ;आणि तालुक्यातील स्विप समुहातील सदस्य शाहिर उदय गांधी,लेखक बाबू घाडीगावकर, विनोदवीर महेश गिम्हवणेकर, संगित साथ महेश शिंदे,विजय भारदे यांचेसह समालोचक संजय मेहता, संजीवनी लाडे आणि सुनंदा मळगे, गणेश तांबीटकर, श्री.सागवेकर आदि.पथनाट्यासह विविध उपक्रम राबवून मतदानाची जनजागृती करीत आहेत. यामध्ये नमन,भारुड,नाट्यछटा या लोककलेच्या माध्यमातून दापोली शिक्षण विभागातील या प्राथमिक शिक्षकांनी मतदानाची जनजागृती सुरु केली आहे.

नागरीकांचाही या कलाजथ्याच्या सादरीकरणाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी ७ मे रोजी होणाऱ्या मतदान कार्यक्रमाचे दिवशी लोकशाही प्रबळतेसाठी सर्व नागरीकांनी आपले अमुल्य मत देवून मतदानाचा हक्क व कर्तव्य बजावावे असे आवाहन नोडल अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी केले आहे.