अधिवक्ता सचिन रेमणे यांनी पत्राद्वारे कथन केला पोस्ट खात्याकडून आलेल्या बेभरवशी सेवेचा अनुभव

जय श्रीराम,

भारतीय पोस्ट खाते हे लोकांच्या पसंतीला उतरलेले, तळागाळात सेवा देणारे खाते आहे. त्यामूळे खेडेगावातील सामान्य नागरिक, वयोवृद्ध, पेन्शनर, कष्टकरी महिला व अगदी लहान मुली देखील सुकन्या समृद्धी खाते योजनेमुळे मा. पंतप्रधान मोदीजी यांचेवर भरवसा ठेवून पोस्टाचे ग्राहक झाले आहेत. मात्र या खात्याची सेवा आता बेभरवशाची ठरू पाहतेय, नेटवर्किंग फेल असल्याचे, सर्व्हर बंद असल्याचे कारण सांगून तेथील बेजबाबदार कर्मचारी, मैलोंमैल पायी चालत येणा-या असंख्य ग्राहकांना दिवसभर ताटकळत ठेवतात किंवा आर्थिक व्यवहारासाठी पुन्हा पुन्हा खेपा मारायला लावतात.

याचाच एक अनुभव नुकताच अनेक ग्राहकांना आला. दिनांक 1 एप्रिल पासून 3 एप्रिल 2024 पर्यंत देशभर पोस्टाचे सर्व आर्थीक व्यवहार ग्राहकांना कोणतीही अगावू जाहीर सूचना न देता, बंद ठेवण्यात आले होते. याचे कारण आर्थीक वर्ष अखेर असल्याने सर्व्हरवर भार होता, असे सांगितले जाते आहे. पण तीन कामाचे पूर्ण दिवस सर्व आर्थीक व्यवहार पूर्णत: बंद असणे हे अधोगतीचे लक्षण आहे. अनेक ग्राहकांना त्यामूळे शारीरिक व मानसिक त्रास भोगावा लागला आहे.

मी दिनांक 03.04.2024 रोजी रत्नागिरीचे मा. डाकघर अधीक्षक यांना पत्र देवून नुकसान भरपाईची लेखी मागणी करतानाच पुढील कोणतेही कामाचे 3 दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत अगाऊ सूचना जाहीरपणे देवून, आर्थीक व्यवहार सूरू ठेवून कामाच्या स्वरूपात ग्राहकांची अधिक सेवा करण्याची विनंती केली आहे. त्यानंतर
पोस्टाने लेखी स्वरूपात दिलगिरी व्यक्त केली आहे.

आपण सुजाण ग्राहक अहात तेव्हा आपणास विनंती आहे की, आपणही या बाबत ईमेल द्वारे doratnagiri.mh@indiapost.gov आणि rogoaregion@gmail.com या दोन्ही मेल खात्यांवर लेखी तक्रार पाठवावी आणि त्याची एक प्रत मला sachinremane@gmail.com या मेल खात्यावर फॉरवर्ड करावी जेणेकरून सर्व ग्राहकांची गैरसोय दूर होईल आणि यापुढे असे प्रकार थांबतील.

आ. वि.
अधिवक्ता सचिन रेमणे, रत्नागिरी