खेड(प्रतिनिधी) : तालुक्यातील चिंचघर बस थांब्याच्या पाठीमागील मोकळ्या जागेत असणाऱ्या गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यावर येथील पोलीसांनी धाड टाकून ५१० रूपयांचा माल जप्त करून आरोपी सुरेश बाबू कडू (वय ५० वर्षे, रा. चिंचघर वेताळवाडी ) याला पोलीसांनी अटकपूर्व नोटीस बजावली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये दोन ५ लिटर मापाच्या सफेद रंगाचे कॅनमध्ये ५०० /- रुपये किंमतीची १० लिटर गावठी हातभट्टीची दारू चा समावेश आहे












