अशोक पोंक्षे यांची हेरंब म्युझिक फाउंडेशन ला १ लाख ७५ हजारांची देणगी

माखजन |वार्ताहर :    संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावचे सुपुत्र,ज्येष्ठ रंगकर्मी,सामाजिक कार्यकर्ते व आंबव पोंक्षे येथील श्री सूर्यनारायण देवस्थान चे अध्यक्ष श्री अशोक काशिनाथ पोंक्षे यांनी श्री रवी पोंक्षे यांच्या हेरंब म्युझिक फॉउंडेशन ला तब्ब्ल १ लाख ७५ हजाराची देणगी दिली. गेली आठ वर्षे सलग या फौंडेशन ला ते प्रतिवर्षी १ लाख इतकी देणगी देत आले आहेत.यावर्षी अमृत महोत्सवी वाढदिवस झाल्याने श्री अशोक पोंक्षे यांनी एक लाख आणि अधिक चे ७५ हजार रक्कम देणगी स्वरूपात देऊ केली आहे.

हेरंब म्युझिकलं फौंडेशन ही गरजू व रुग्णांना मदत करते.या कार्यात एक भाग म्हणून श्री अशोक पोंक्षे दरवर्षी हेरंब म्युझिकलं ला आर्थिक मदत करत असतात.त्यांच्या या अनमोल देणगी बद्दल सर्वत्र आभार व्यक्त केले जात आहेत.