दापोली l प्रतिनिधी: श्रमजीवी परिवार, मुंबई या संस्थेचा यावर्षीचा समाज गौरव पुरस्कार बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन च्या माजी सभापती श्रीमती जानकी बेलोसे यांना देण्यात झाला आहे.
श्रमजीवी परिवार सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, धार्मिक, कलाक्रिडा, सहकार क्षेत्रात मोठ्या मनाने काम करणाऱ्या गुणीजनांना “श्रमजीवी गौरव पुरस्कार- २०२४” देऊन सन्मानित करतो. सदर पुरस्कार जानकी उदय बेलोसे यांना ख्यातनाम साहित्यिक ॲड. धनराज वंजारी यांच्या हस्ते दापोली येथील समारंभात देण्यास आला. इंग्रजी माध्यम शाळा, महिला सबलीकरण, उद्योगविषयक सल्ला या क्षेत्रात जानकीताई बेलोसे यांचे उल्लेखनीय कार्य आहे.
पुरस्कार मिळाल्याबद्दल बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन संस्थेतर्फे सभापती श्री धनंजय लक्ष्मणराव यादव, कार्यवाह डॉ. दशरथ भोसले, तर वराडकर कॉलेज तर्फे प्राचार्य डॉ. भारत कराड, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.










