रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुक प्रमुख प्रमोद जठार यांची उपस्थिती
लांजा (प्रतिनिधी) राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा क्षेत्रातील भांबेड पं. स. गणाची बैठक भाजपा कार्यकर्ते शंकर गांधी यांच्या भांबेड येथील निवासस्थानी आज रविवारी १४ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता संपन्न झाली.
या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुक प्रमुख प्रमोद जठार हे उपस्थित होते. तसेच राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख सौ. उल्का विश्वासराव, जिल्हा सरचिटणीस रविंद्र नागरेकर, लांजा तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, जिल्हा उपाध्यक्ष महेश (मुन्ना) खामकर, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. परिणिता सावंत, राजन देसाई, जिल्हा सरचिटणीस संजय आयरे तसेच बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, सुपर वॉरियर्स व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रमोद जठार यांनी बूथ स्तरावर आत्तापर्यंत झालेल्या संघटन कार्याचा आढावा घेऊन उत्तम कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. सर्वांनी अशाच पद्धतीने आपले काम चोख पार पाडल्यास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अपेक्षित धरलेला #महाविजय_२०२४ दूर नाही. मतदार यादीचे वाचन करून मतदारांचे वर्गीकरण करणे, मुंबईस्थित मतदारांना दि. ७ मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी आग्रहपूर्वक बोलावणे, त्याबाबत नियोजन करणे आदी कार्यक्रमांबाबत प्रभावी मार्गदर्शन केले.












