गावखडी /वार्ताहर:
रत्नागिरी तालुक्यातील गावखडी श्री स्वामी समर्थ मठात श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
तसेच प्रतिवर्षी प्रमाणे गुरूवार दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी मठामधे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी छत्रपतींचे पूजन, दुपारी नैवेद्य अर्पण करून महाआरती होतील. त्यानंतर महाप्रसाद वाटप होईल तरी सर्व भक्तगणांनी मठामधे उपस्थित रहावे व या सोहळ्यामधे सहभागी होऊन श्री स्वामी देवांच्या व छत्रपतींच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे
आवाहन करण्यात आले आहे
Home महत्वाच्या बातम्या गावखडी श्री स्वामी समर्थ मठात श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे...











