फोंडाघाट- पावणादेवी ( हेळेवाडी ) गणपती साना चे बांधकाम निकृष्ट

बांधकाम अंदाजपत्रकाप्रमाणे होईपर्यंत,ठेकेदाराचे बिल थांबविण्याची ग्रामस्थांची मागणी !

 फोंडाघाट | कुमार नाडकर्णी –—– मार्चपूर्वी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील बांधकामे घाईघाईत पूर्ण करून, बिलाची रक्कम खिशात घालण्याचा ठेकेदारांच्या पद्धतीचा परदाफाश फोंडाघाट- पावणादेवी येथील ग्रामस्थांच्यावतीने, श्री विजय जामदार यांनी फोंडाघाट सरपंच,तसेच ग्रामविस्तार अधिकारी सह गटविकास अधिकारी, कणकवली यांना निकृष्ट बांधकामाबद्दल निवेदन देऊन केला…

तारीख 22- 3-24 आणि 25-3- 24 रोजी दिलेल्या निवेदनातून पावणादेवी- हेळेवाडी गणपतीसाना चे अंदाजपत्रक मागितले होते. मात्र संबंधितांनी मार्च अखेर आणि निवडणूक कामकाजाचे कारण दाखवून टाळाटाळ करत, अखेर तारीख 30-3-24 रोजी सक्षम अधिकाऱ्याची सही नसले तथाकथित अंदाजपत्रक तक्रारदारांना दिले. मात्र होत असलेले काम सदर अंदाजपत्रकाप्रमाणे नसल्याने, प्रारूप आराखडा आणि सक्षम संबंधित अभियंता यांनी प्रत्यक्ष कामा वर उपस्थित राहून तक्रारदारांचे समाधान करावे ,अशी आग्रही भूमिका पुन्हा एकदा तारीख 3-4-24 रोजी तक्रारदारांनी संबंधित सर्वांना देऊन, अंदाजपत्रकाप्रमाणे जोपर्यंत काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत ठेकेदाराचे बिल थांबविण्यात यावे.अशी आग्रही मागणी तक्रारदार विजय जामदार,रामचंद्र पाळेकर,नारायण वाळवे ,रुपेश वाळवे, श्री. ग.रेडकर ,रामदास वाळवे इत्यादींनी ग्रामस्थांच्या वतीने केली आहे.याबाबत कार्यवाही न झाल्यास निवडणूक आचारसंहिता संपल्यावर सात जून नंतर उपोषणाचाही इशारा देण्यात आला आहे…..