महायुतीचे उमेदवार नारायण राणे कुटुंबासमवेत रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी चरणी झाले नतमस्तक

रत्नागिरी;रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी चे महायुतीचे उमेदवार नारायण राव राणे यांनी कुटुंबासमवेत दर्शन घेतले. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी रत्नागिरीत येतातच राणे कुटुंब प्रथम रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी च्या चरणी नतमस्तक झाले. त्यानंतर ते महायुतीच्या रॅलीत सहभागी होणार आहेत. श्री देव भैरी च्या दर्शना वेळी सौ नीलम ताई राणे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार बाळ माने,माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत ,सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सावंत व भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.