केंद्रीय मंत्री नारायण राणे आज दोडामार्ग दौऱ्यावर 

महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद 

दोडामार्ग l प्रतिनिधी :     रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे आज संध्याकाळी दोडामार्ग तालुका दौऱ्यावर येत आहेत. यावेळी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, मनसेच्या तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेत रणनीती आखण्यात येणार आहे. परमेकर हॉलमध्ये संध्याकाळी ४ वाजता ना. नारायण राणे संवाद साधणार आहेत.

 

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी काल रत्नागिरीत भव्य शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज सादर केला. त्यानंतर पहिल्याच दौऱ्यात ते दोडामार्ग तालुक्यापासून महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. महायुतीच्या तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी केले आहे.