२३ रोजी माखजन येथे हनुमान मंदिरात सुगम संगीताची मैफिल

माखजन |वार्ताहर :      संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे श्री हनुमान मंदिरात २२ ते २३ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे.

 

यानिमित्त २३ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजता सुगम संगीता चा विशेष कार्यक्रम होणार आहे.यामध्ये दीपक पोंक्षे,भरत आंबेटकर,संपदा बापट,समृद्धी पेंडसे,प्राची रानडे आदी कलाकार आपली गायन कला सादर करणार आहेत.तर यावेळी हार्मोनियम ची साथ आशिष शेंबेकर,तबला निखिल रानडे करणार आहेत.तर निवेदन भावना आंबेटकर करणार आहेत.