संगमेश्वर (प्रतिनिधी) : तालुक्यातील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी शिवने या विद्यालयातील पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. पूर्वमध्यमिक शिष्यवृत्ती गटात इयत्ता ५ वी मधील विद्यार्थिकुमार हर्ष कदम, कुमारी अंतरा सप्रे व कुमार जयेश गुरव गुणवत्ता यादीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. तर माध्यमिक गटात इयत्ता ८ वी मधील कुमारी अनन्या डोळस, कुमार युगा कोळवणकर व कुमार रितेश गेल्ये हे विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झाले आहेत.
या विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिष्यवृत्ती विभाग शिक्षक संदिप नटे, शितल सावंत, स्वरा शिंदे, स्मिता हर्डीकर , निलम पवार, अमित भुवड, राकेश बांद्रे, स्वरूपा भोसले या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले/ प्रशालेतील शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष राजाराम गर्दे सर, उपाध्यक्ष शांताराम भुरवणे, उपाध्यक्ष दिलीप मोरे, सरचिटणीस शरद बाईत, खजिनदार महेश जाधव, सचिव ललितकुमार लोटणकर, सर्व संस्था संचालक तसेच प्राचार्य प्रकाश विरकर, पर्यवेक्षक महावीर साठे यांच्यासह शिक्षक, पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.












