खेड (प्रतिनिधी) तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने तालुक्यातील वरवली- धुपेवाडी येथील श्री सोमजाई केदार क्रीडामंडळ व ग्रामस्थ मंडळाच्यावतीने हनुमान जयंतीनिमित्त २२ ते २३ एप्रिल या कालावधीत निमंत्रित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुकास्तरीय खुला गटाच्या स्पर्धेतील विजेत्यास सद्गुरू नाना यांच्यामार्फत ५००१ रुपये, उपविजेत्यास भारती सावंत यांच्या स्मरणार्थ विकास सावंत यांच्यातर्फे ३००१ रुपये, तृतीय क्रमांकास अशोक कदम यांच्या स्मरणार्थ राजेंद्र कदम यांच्या माध्यमातून २००१ रूपये व चतुर्थ क्रमांकास श्रीपत गोगावले यांच्या स्मरणार्थ अक्षय गोगावलेंकडून १००१ रूपये व चषक देवून गौरवण्यात येणार आहे. तालुकास्तरीय ५० किलो वजनी गटातील विजेत्यास विलास शिर्के यांच्या स्मरणार्थ कैलास शिर्के यांच्याकडून ३००१ रूपये, उपविजेत्यास २००१ रूपये, तृतीय क्रमांकास १००१ रूपये तर चतुर्थ क्रमांकास रामचंद्र सावंत यांच्या स्मरणार्थ अमित सामंत यांच्याकडून १००१ रूपये व चषक देवून गौरवण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड व सामनावीर यांनाही प्रत्येकी ५०१ रूपये चषक देवून सन्मानित करण्यात येणार आहे.











