मंडणगड | प्रतिनिधी : तालुक्यातील पणदेरी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या विरोधात गटविकास अधिकारी मंडणगड यांनी 24 मार्च 2023 रोजी अपात्रतेच्या कारवाईची नोटीस बजावली आहे. या संदर्भात ग्रामस्थ श्री. राजेश पारेख यांनी लेखी तक्रार करीत प्रशासकीय पातळीवर सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे उपरोक्त कारवाई झालेली असल्याची माहीती श्री. पारेख यांनी पत्रकारांना दिली आहे. गटविकास अधिकारी मंडणगड यांना 03 मार्च 2023 रोजी उपजिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त झालेली लेखी पत्रानंतर ही कारवाई झालेली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्या लेखी आदेशात उपरोक्त कारवाई ही महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (1959 या मुंबई अधिनयम क्रमांक 3) कलम 39(1) अन्वये झाली असून संबंधीतांना अधिकार पदावरुन काढून टाकण्यात आले होते. या आदेशाना कोकण आयुक्त यांनी 16 एप्रिल 2021 रोजी स्थगिती आदेश दिली होती.
कारवाई नंतर कोणत्याही न्यायालयाने दिलेले स्थगित आदेश सहा महिन्याकरिता राहतात सबळ पुराव्यांचे आधारे स्थगित आदेश कायम राहता अन्यथा स्थगिती पुन्हा लागू होते तक्रारीनंतर कारवाई थांबावी या करिता कोणताही स्थिगीत आदेश आल्याचे निदर्शनास येत नसल्याने राजेश पारेख यांनी वांरवार केलेली तक्रार व जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शन यांच्या आधारे गटविकास अधिकाऱी मंडणगड यांनी कारवाईचे पत्र काढले आहे व या पत्रात स्थगीत आदेश होत नाही तोपर्यंत आपण सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत राहणार नसल्याचे स्पष्ट आपल्या पत्रात नमुद केले आहे. कारवाईच्या पत्राची स्थळ प्रत तक्रारदार राजेश पारेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी तसेच ग्रामसेवक पणदेरी यांच्याकडे माहीतीसाठी अग्रेशीत करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पणदेरी ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीमती संध्या पोस्टुरे, उपसरपंच नसरुद्दीन काझी, ग्रामपंचायत सदस्या, गीता पारेख, मनाली शिगवण, विद्या पंदिरकर, संतोष मुकणे यांची लोकप्रतिनिधी म्हणून असलेली पदे धोक्यात आली असून या कारवाईच्या विरोधात अपील न केल्यास संबंधीतांची अपत्रतेची कारवाई कायम राहू शकते.
तक्रादार राजेश पारेख यांनी आपल्या पुर्वजांच्या स्थावर जंगम मालमत्तेच्या असमान वितरण व त्यांच्या मुलभूत हक्कावर गदा आणल्याची वादातून केलेल्या तक्रारीनंतमुळे झाली असून संपत्तीचे वाटप करताना ग्रामपंचायतीने आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका पारेख यांनी ठेवला होता. दरम्यान सक्षम पुराव्यानिशी केलेल्या पाठपुराव्यानंतर झालेल्या कारवाईसंदर्भात श्री. पारेख यांनी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी, तहसिलदार मंडणगड, व गटविकास अधिकारी मंडणगड यांचे आभार मानले आहेत. प्रशासकीय यंत्रणा सर्वासाठी असून यंत्रणेकडे योग्य तो पाठपुरावा केल्यास यंत्रणा सर्वासमान्यासही न्याय देवू शकते यांचे हे उत्तम उदाहरण असल्याचे पारेख यांनी या निमीत्ताने सांगीतले आहे.