खेड(प्रतिनिधी) येथील नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबात तांत्रिक बिघाड होऊन. आठवडाभरापूर्वी अग्निशमन बंब दुरूस्तीसाठी चिपळूणला पाठवण्यात आला आहे. मात्र अद्याप बंबाची दुरूस्तीच झाली नसल्याने आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. येत्या दोन- तीन दिवसात अग्निशमन बंब प्राप्त होईल, असे सांगण्यात आले.
. गेल्या तीन महिन्यात येथील अग्निशमन केंद्रातील बंबाने तब्बल ३८ ठिकाणी लागलेल्या आगी विझवण्याची महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. यामध्ये ४ घरांचाही समावेश आहे. आधीच येथील अग्निशमन केंद्रात अपुरे बळ असताना देखील आग अथवा वणव्याबाबतचा कॉल आल्यानंतर घटनास्थळी तातडीने पोहचण्याची तत्परता केंद्रातील कर्मचारी
येथील अग्निशमन बंबामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने दुरूस्तीसाठी चिपळूण येथे पाठवण्यात आला आहे.
आठवडाभराचा कालावधी लोटून देखील बंब अद्याप प्राप्त झालेला नाही. यामुळे आग अथवा वणव्यासारखी दुर्घटना घडल्यास सारी मदार लोटे औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन केंद्रावरच आहे. येत्या एक-दोन दिवसातच अग्निशमन बंबाची दुरूस्ती होवून नगरपरिषदेला प्राप्त होईल, असे सांगण्यात आले.











