खेड(प्रतिनिधी) ‘तू दारुचा धंदा करतोस, आताच्या आता दोन लाख रुपये दे अन् दरमहा दहा हजार रुपये दे’ असे धमकावत ६० हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचा जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल्ला हुसैन नाडकर (५६, रा. संगलट-खेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात अजून तिघांचा सहभाग असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ही घटना १४ सप्टेंबर २०२४ रोजी घडली होती.
याबाबत प्रकाश महादेव महाडिक (रा. संगलट, खेड) यांनी १३ मार्च रोजी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयित हा इनोव्हा कारमधून (एमएच ०४ एफआर १९९९) फिर्यादीच्या घरी गेला होता. आपण लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचा मोठा साहेब असल्याची बतावणी करत त्याने संशयिताने २ लाख रुपयांची खंडणी मागितली. मात्र एवढी रक्कम नसल्याचे फिर्यादीने सांगितल्यावर त्याने १ लाख रुपयांची खंडणी मागितली. ही रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर शिवीगाळ करत त्याने शहरातील महाडनाका येथील कार्यालयात ६० हजार रुपये घेवून ये, असे दरडावत कोणाला सांगितल्यास सोडणार नाही, अशी धमकी फिर्यादीस दिली होती










