ना. राणेंसह महायुतीचे नेते रहाणार उपस्थित
राजापूर (प्रतिनिधी़):रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी २६ एप्रिल रोजी राजापूर तालुक्यात आडिवरे व पाचल अशा दोन ठिकाणी जाहिर प्रचार सभा होणार असल्याची माहिती भाजपाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रभारी माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली.
सोमवारी राजापुरात पत्रकार परिषदेत जठार यांनी ही माहिती दिली. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांच्या प्रचारार्थ मतदार संघात अनेक मान्यवरांच्या प्रचार सभा होणार आहेत. राजापूर विधानसभा मतदार संघात शुक्रवारी २६ एप्रिल रोजी आडिवरे व पाचल अशा दोन ठिकाणी जाहिर प्रचार सभा होणार आहेत. आडिवरे येथे सकाळी ११ वाजता तर पाचल येथे सायंकाळी ५ वाजता या सभा होणार आहेत. या सभेला खुद्द ना. नारायण राणे, महायुतीतील शिवसेनेचे नेते किरण सामंत यांसह आपण स्वता व महायुतीचे अनेक मान्यवर नेते उपस्थित रहाणार आहेत.
या सभांची तयारी महायुतीच्या वतीने हाती घेण्यात आली असून या सभेला महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जठार यांनी केले आहे.
—————————————————————————————–











