बिजघरात वादळी वाऱ्याने ६ लाखांची हानी

खेड | प्रतिनिधी : 
 
खेड तालुक्यातील बिजघर येथे वादळी वाऱ्याने पडवीसह सभामंडप कोसळून ६ लाख रूपयांची हानी झाली. या नुकसानीचा पंचनामा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. बिजघर येथील रमेश दिनकर भोसले, मधुकर दिनकर भोसले यांच्या मालकीच्या पडवी व सभामंडपाला दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्याचा फटका बसला. संपूर्ण पडवी कोसळून सभामंडपाचीही मोठी हानी झाली. ६ लाखांहून अधिक रूपयांचे नुकसान झाले.