अवजड वाहतुकीने भोस्ते जगबुडी पूल बनलाय धोकादायक!

चार वर्षांपूर्वी पुलाला तडा; दुरुस्तीचा प्रस्ताव लालफितीत; प्रशासनाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष
खेड (प्रतिनिधी)
भोस्ते जगबुडी पुलावरून सतत सुरू असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे पूल धोकादायक स्थितीत आहे. पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव अजूनही लालफितीत अडकला आहे. यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांचा जीव टांगणीवर आहे. प्रशासनाकडून पुलाच्या दुरुस्तीची आजवर देण्यात घर देण्यात आलेली आश्वासने हवेतच विरली . यामुळे दुर्घटना पडल्यानंतरच प्रशासन जागे आहेत. यामळे होणार का? असा सवाल वाहनचालकांसह नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पादचाऱ्यांकडून भोस्ते जगबुडी । पुलावरून बाहनांची सतत वर्दळ सुरू असते. वेळेच्या बचतीसाठी सर्वच वाहनांना पूल वाहतुकीसाठी सोयीस्कर ठरतो. रेल्वे स्थानकात ये- जा करण्यासाठी वाहनचालक याच पुलाचा सरासपणे वापर करतात. भोस्ते, अलसुरे , कोडिवली, निळीक आदी भागातील ग्रामस्थ दैनंदिन धोकादायक भोसतें जगबुडी पुलामुळे वाहनचालक व पादचाऱ्याची सुरक्षितता ऐरणीवर असतानाही प्रशासन हाताची घडी अन तोडावर बोट ठेवत आहे. ही अत्यंत खेदजनक बाब आहे.
कामासाठी शहरात येण्याकरिता याच पुलाचा वापर करतात. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थीसह वाहतूकदारांसाठी देखील हा पूल फायदेशीर ठरत आहे. चार वर्षापूर्वी पुलाच्या एका बाजूला मध्यभागी तडा गेला होता. यामुळे पुलाची सुरक्षितता ऐरणीवर आली होती. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने दोन्ही बाजूला तात्पुरत्या स्वरुपाची मलमपट्टी करत दुरुस्तीचे सोपस्कर पार पाडले होते. पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्तावही मंजुरीसाठी वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आला होता. मात्र, पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव लालफितीत अडकून पडला आहे. धोकादायक स्थितीतील पुलाच्या डागडुजीसाठी काँग्रेस पक्षासह विविध स्वयंसेवी संस्थांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करूनदेखील पदरी निराशाच पडली आहे.
 प्रशासनाकडून सातत्याने लवकरच दुरुस्ती दरुस्ती होईल, असे देण्यात आलेले आश्वासनही फोल ठरले आहे. याच भोस्ते जगबुडी पुलावरून अवजड वाहनांची  सतत वाहतूक सुरू असते. विशेषतः वाळू वाहतुकीसाठी वाहनचालक दिवसाढवळ्या व रात्री-अपरात्री याच पुलाचा वापर करतात. नगरप्रशासनाने भोस्ते पुलावरून अवजड वाहतुकीस मज्जाव करत तसा सूचनाफलकही पुलाजवळ लावला होता; मात्र तरीदेखील भोस्ते जगबुडी पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे