गाठीभेटी घेऊन अनेकजणांशी साधला संवाद
रत्नागिरी (वार्ताहर)
केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांच्या प्रचारासाठी माजी खासदार निलेश राणे मैदानात उतरले असून शनिवारी त्यांनी पावस दशक्रोशीचा दौरा केला. यावेळी त्यांनी अनेकजणांशी संवाद साधला व तेथील समस्या जाणून घेतल्या. काय उपाय करता येतील हे सांगताना त्यातून त्यांना सकारात्मक प्रतिसादही ठिकठिकाणी मिळाल्याचे दिसून आले. यावेळी निलेश राणे यांनी गावचा विकास करताना हा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने होणे गरजेचे आहे, असे सांगितले. कोकणच्या अर्थव्यवस्थेला चालना हवी असेल तर आपल्याला मोदींच्या कमळ या निशाणीवर मतदान करायला हवे, असे निलेश राणे यांनी सांगितले. ‘अब की बार चारसौ पार’मध्ये आपल्या जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गचा हक्काचा खासदार केंद्रात पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी निलेश राणे यांनी स्वामी स्वरूपानंद मंदिराला भेट देताना दर्शन घेऊन कृपाशीर्वाद घेतला. यावेळी मावळंगे, पावस, गोळप येथील अनेक पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्याशीही त्यांनी वार्तालाप केला. येत्या ७ मे ला रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसभेसाठी मतदान होणार असून ना. नारायण राणे हे या लोकसभेचे महायुतीचे उमेदवार असून त्यांचे चिन्ह कमळ आहे. कमळ चिन्ह सर्वांना ज्ञात व्हावे यासाठी निलेश राणे यांनी प्रथम गोळप नंतर मावळंगे येथील मतदारांशी संवाद साधला.
यावेळी महाकाली उद्योग समुहाचे अनंत शिंदे तसेच भाजपचे पदाधिकारी प्रा. नाना शिंदे, विजय चव्हाण, सुनील नावले, श्री. भाटकर, श्री. दळी तसेच उद्योजक सुहास शिंदे आदींसह दशक्रोशीतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच वसंत नेने, वैदेही गुळेकर, मंगेश गुळेकर, अजय पानगले, अभी शिंदे, कृष्णा नैकर, अजय पानगले, सागर सोलकर, सुशांत पाटकर, संतोष शिंदे, बंड्या आडिवरेकर, गजा पाडळकर, बाळू नरवणे, विकास तावडे, मंगेश चव्हाण, वैभव कोटकर, उत्तम अभ्यंकर, संजय पाखरे, राजेश पाथरे, वासुदेव वाघे, विश्वास थुल, मिलिंद गुरव, संजय गोगटे, दिनेश थुल, संतोष सुर्वे, कमलाकर लांजेकर, अनिल बिर्जे आदींसह अनेक पदाधिकारी, शेतकरी, उद्योजक यावेळी उपस्थित होते.












