उमेद अंतर्गत रामपूर नवस्फूर्ती महिला प्रभाग सर्वसाधारण सभा उत्साहात

Under Umed, Rampur Navsphurti Women’s Ward General Meeting in excitement

चिपळूण | वार्ताहर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान, नवस्फूर्ती महिला प्रभाग संघ रामपूर १९ गावातील ग्राम संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रामपूर ग्रामपंचायत संपन्न झाली. यावेळी प्रमुख अतिथी सहाय्यक गटविकास अधिकारी श्री कांबळे उपस्थित होते.रामपूर, निर्व्हाळ,रावळगाव, पाथर्डी-मिरवणे, कळमुंडी, कौंढरताम्हाने, मार्गताम्हाने खुर्द, मार्गताम्हणे, तनाळी-आंबेरे, बोरगांव, बामणोली, उभळे, गुढे, कात्रोळी, डुगवे, चिवेली, गोंधले, बामणोली, कात्रोली, वाघिवरे या गावातील १९ ग्रामसंघ मधून एकूण १५० महिला सभेसाठी सहभागी झाल्या.या सभेच्या अध्यक्षस्थानी सौ. अक्षता अनिल साळवी होत्या. रामपूर प्रभागात ३३० समूह असून त्यात ३४२७ महिला समाविष्ट आहेत. १९ ग्रामसंघ स्थापन झाले आहेत.या आर्थिक वर्षात फिरता निधी प्राप्त संख्या ४२ फिरता निधी ६ लाख ३०,००० रु. बँक अर्थ सहाय्यक समूह संख्या ९२, एकूण ३ कोटी ९१ लाख ६० हजार रु. निधी उपलब्ध झाला. प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य योजना बीज भांडवल ३ समुहातील १३ सदस्यांना ४ लाख ८० हजार मिळाले. ही माहिती प्रास्ताविकात प्रभाग समन्वयक श्री. सुहास माळी यांनी दिली.

नवस्फूर्ती महिला प्रभाग संघ रामपूरतर्फे मान्यवरांना महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू देऊन सत्कार केला. प्रार्थनेने सभेचा शुभारंभ झाला. ध्वनीचित्रफित द्वारे विविध शासकीय योजना दाखवण्यात आल्या. यावेळी मनोगते CRP सौ.हर्षदा कोकाटे, MIP CRP सौ. वर्षा चव्हाण, वर्धीनी सौ. दिपाली भडवलकर श्री. पाटील साहेब, श्री.कांबळे साहेब, श्री.काटकर सर यांची समयोचित भाषणे झाली. बचत गटातर्फे महिलांनी तयार केलेल्या मालाच्या प्रदर्शने लावण्यात आली होती कृषि अधिकारी श्री.पाटील साहेब, जिल्हा व्यवस्थापक व तालुका अभियान व्यवस्थापक श्री.अमोल काटकर साहेब,तालुका व्यवस्थापक श्री. वायदंडे,तालुका व्यवस्थापक सौ. घोडके मॅडम, प्रभाग समन्वयक सावर्डे श्री.जाधव साहेब, प्रभाग समन्वयक रामपूर श्री.सुहास माळी सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्तीत होते..सूत्रसंचालन व निवेदन सौ.योगिता शिर्के यांनी केले. विशेष परिश्रम अध्यक्षा अक्षता साळवी, अमिषा रामपूरकर, कोषाध्यक्षा स्मिता चव्हाण, सचिव आश्विनी अशोक जाधव, प्रभागसंघ लिपिका सौ.आदिती शिंदे यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. सौ. मृणली रावराणे व इतर पदाधिकाऱ्यांनी सभेसाठी खूप परिश्रम घेतले.उपस्थित सर्वांचे आभार मानून अध्यक्ष सौ. साळवी यांनी सभेची सांगता केली.