नानासाहेब ठोंबरे यांचा सेवानिवृत्ती प्रसंगी सत्कार

माखजन |वार्ताहर
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल येथील शिक्षक नानासाहेब धोंडीराम ठोंबरे हे नियतवयोमनानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा शाळा व संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.

 

नानासाहेब ठोंबरे यांनी ३८ वर्षे सेवा वाहिली.निवृत्ती प्रसंगी त्यांची आई,पत्नी,मूल, व नातेवाईक उपस्थित होते.शिक्षकांनी त्यांच्या विषयी मनोगते व्यक्त केली.यावेळी शाळेकडून मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर यांनी तर संस्थेकडून अध्यक्ष डॉ.दत्तात्रय बापट,उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर यांनी श्री नानासाहेब ठोंबरे यांचा सन्मान केला.

 

यावेळी माजी विद्यार्थी उपस्थित होते.त्यांनी श्री ठोंबरे यांना शुभेच्छा यावेळी संस्था संचालक दीपक शिगवण,राजेश फणसे,तर सतीश साठे,कुलदीप भागवत,राजू कदम,निलेश लाड,पर्यवेक्षक अंबादास घाडगे आदी उपास्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार नामजोशी यांनी केले.