म्हापसा येथील श्री बोडगेश्वर मंदिरात चोरी

म्हापसा : प्रतिनिधी

म्हापसा येथील अत्यंत जागृत देवस्थान अशी ख्याती असलेल्या श्री देव बोडगेश्वर मंदिरातील फंड पेटी चार अज्ञात बुरखाधारी चोरट्यानी फोडली. ही घटना सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. म्हापसा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.

मापसा पडगेश्वर देवस्थान हे गोव्यासह महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात भाविकांची कायमच गर्दी असते. सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चार बुरखाधारी चोरट्यानी मंदिरात प्रवेश केला. तेथील सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेऊन त्याला खुर्चीला बांधून ठेवले व मंदिरातील दोन फंडा पेट्या फोडून आतील रोकड लंपास करून त्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. देवस्थान समिती अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी म्हापसा पोलिसात तक्रार दिली आहे. बोडगेश्वर मंदिरात महिनाभरातील ही चोरीची दुसरी घटना आहे.