भाजपा मच्छीमार सेल, सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांचे मच्छीमार आणि मत्स्य व्यावसायीक यांना आवाहन
अमित खोत | मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेली नीलक्रांती साकारण्यासाठी ना. नारायणराव राणे यांना उत्स्फूर्त मतदान करा. असे आवाहन भाजपा मच्छीमार सेल, सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी मच्छीमार आणि मत्स्य व्यावसायीक यांना केले आहे.
भारतातील ८२०० किलोमीटरची किनारपट्टी तसेच मत्स्यपालन या क्षेत्राला बळ देण्यासाठी सन २०१४ ते २०१९ नीलक्रांती ही योजना तर २०२१ पासून पुढे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनांमध्ये मत्स्य व्यवसाय बरोबरच मच्छीमाराला राहती घर, बंदी कालावधीतील अनुदान, मासेमारी जाळी, नौका सक्षमीकरण, वाहतूक व्यवस्था साठी इन्सुलिटेड व्हॅन प्रक्रिया उद्योग, बर्फ कारखाने त्याचबरोबर खोल समुद्रातील मासेमारी अश्या प्रकारच्या अनेक योजनांचा समावेश आहे. त्याचा लाभ हजारो लाभार्थ्यांनी घेतला आहे. तसेच मत्स्य पालन करणाऱ्या मत्स्य शेतकऱ्यांसाठी विविध योजना मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात राबविले आहेत. ४० ते ६० टक्के पर्यंत भरघोस अनुदान लाभार्थी यांना गेल्या दहा वर्षांमध्ये मिळालेले आहे. पुढेही मिळणार आहे. त्याचबरोबर मत्स्य व्यवसायासाठी आवश्यक पायाभूत सोयी सुविधांचा विकास सदर योजनेमध्ये केलेला आहे. वीस हजार कोटी रुपयांची तरतूद या पाच वर्षासाठी मोदी सरकारने केली होती. त्याचा पुरेपूर फायदा मत्स्य व्यवसायाला होत आहे. भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाची व्याप्ती वाढवण्यासंदर्भात आश्वासन दिले आहे. याचा फायदा अनेक मत्स्यव्यवसायिक लाभार्थी यांना होणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गचा विचार केला असता अनेक लाभार्थी यांनी याचा लाभ घेतला आहे. त्यामध्ये बर्फ कारखाने, यांत्रिक नौका सक्षमीकरण, पारंपारिक नौका, जाळी खरेदी, मत्स्यपालन क्षेत्र, मत्स्य सेवा केंद्र व इतर अनेकविध योजनांचा समावेश आहे. आज मीतीस सदर योजनेच्या अंतर्गत अनेक कोटी रुपयाचे प्रस्ताव मंजूर झालेले आहेत. काही प्रस्तावित आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांना लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि मुबलक पाण्याची व्यवस्था यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अतिशय उत्कृष्टपणे राबवण्याचे श्रेय पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या सागर मित्र यांच्या माध्यमातून होत आहे.
भविष्यातील मत्स्य व्यवसायाच्या प्रगतीसाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना व्याप्ती वाढण्याची गरज आहे. त्यासाठी भारतीय जनता पार्टी महायुतीला विजयी करा. या सर्व योजनेचा केंद्रीय स्तरावर यशस्वी न्याय पाठपुरावा करण्यासाठी ना. नारायण राणे साहेब यांच्यासारखा प्रशासनावर पकड आणि मत्स्यव्यवसायची पुरेपूर जाण असलेल्या नेत्याची लोकसभेमध्ये गरज आहे. यासाठी सर्व मच्छीमार बांधव भगिनी, मत्स्यव्यवसायिक, मत्स्य पालक यांना आम्ही आवाहन करीत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेली नीलक्रांती प्रत्यक्षात आणण्यासाठी ना. नारायण राणे साहेब यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्या मतदार संघातून भरघोस मतांनी विजयी करूया. असे रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.












