लांजा नगरपंचायतीमध्ये पार पडला घनकचरा व्यवस्थापन व मैला व्यवस्थापन विषयावर प्रशिक्षण

लांजा | प्रतिनिधी : लांजा नगरपंचायतीमधील सर्व सफाई कर्मचाऱ्यांसाठी आयोजित घनकचरा व्यवस्थापन व मैला व्यवस्थापन या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रम नगरपंचायत कार्यालय येथे पार पडला. कोल्हापूर येथील दिव्यस्वप्न फाउंडेशन या संस्थेमार्फत या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पूर्वा मुळ्ये तसेच नगरपंचायतीच्या स्वच्छता पर्यवेक्षक सोनाली खैरे, कर निरीक्षक पल्लवी पुळकुटे ,सिटी कोऑर्डिनेटर हर्षदा जाधव तसेच कर्मचारी प्रशिक्षक शिवराज पवार हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित नगरपंचायत च्या सफाई कर्मचाऱ्यांना दिव्य स्वप्न फाउंडेशन यांच्या वतीने क्षमता कार्यशाळा व घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन आणि वैयक्तिक स्वास्थ्य व सुरक्षा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणात नगरपंचायतीचे सर्व सफाई कर्मचारी वर्ग सहभागी झाले होते.