खेड(प्रतिनिधी) वेरळ परिसरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. कुत्र्यांचा वावर दिवसागणिक वाढतच असल्याने पालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मोक्याच्या ठिकाणी कुत्र्यांच्या दहशतीमुळे खेळण्यासाठी
जाणाऱ्या बच्चे कंपनीचा हिरमोड होत आहे. मोकाट जनावरांपाठोपाठ कुत्र्यांचा वावर कमी होण्याऐवजी वाढतच आहे.
कोणत्याही क्षणी कुत्र्यांच्या झुंडी भर रस्त्यात दाखल होत असल्याने साऱ्यांचीच त्रेधातिरपीट उडत आहे. विशेषतः वाहनचालकांची फसगत होत असून अपघातदेखील घडत आहेत. या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायत कुठलीच कारवाई करत नसल्याने ग्रामपंचयातीने ही बाब गांभीर्याने घेण्याची मागणी होत आहे.











