मातोंड येथे १६ मे रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा

 

न्हावेली । प्रतिनिधी : इसोटी प्रासादिक मित्रमंडळ,मातोंड भरभरेवाडी तर्फे गुरुवार १६ मे रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे उद्धाटन व सत्कार समारंभ सायंकाळी ६ वाजता होणार असून निमंत्रित भजन मंडळाचे सादरीकरण सायंकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे.

 

यामध्ये सहभागी संघ पुढीलप्रमाणे —
श्री देवी भवानी भजन मंडळ, न्हावेली रेवटेवाडी ( बुवा – अक्षय जाधव ) महापुरुष भजन मंडळ,पिंगुळी ( बुवा – प्रसाद आमडोसकर ) श्री रवळनाथ भजन मंडळ,पाडलोस ( बुवा – अजित गावडे ) बाळगोपाळ भजन मंडळ,हरकुळ खुर्द ( बुवा – आकांक्षा राणे ) श्री देव रवळनाथ भजन मंडळ,पिंगुळी ( बुवा – रुपेश यमकर ) श्री लिंगेश्वर पावणादेवी भजन मंडळ,जानवली कणकवली ( बुवा- योगेश मेस्री ) सद्गगुरु भजन मंडळ,अणसूर ( बुवा – हर्षल मेस्री ) श्री दत्त भजन मंडळ,वर्दे ( बुवा – नरेंद्र मेस्री ) श्री देव माऊली भजन मंडळ, साटेली ( बुवा – सत्यनारायण कळंगुटकर ) हे संघ सहभागी होणार आहेत.उपस्थित राहण्याचे आवाहन इसोटी प्रासादिक मित्रमंडळ,मातोंड भरभरेवाडी यांच्याकडून करण्यात आले आहे.