विठ्ठल मंदिरात २० मे रोजी ‘आजचा काळ आणि भगवद्गीता’ या विषयावर राजेंद्र प्रसाद मसुरकर ह्यांचे प्रवचन

 

रत्नागिरी : सद्गुरू डॉ.श्रीकृष्ण देशमुख काका परिवार तर्फे रत्नागिरी विठ्ठल मंदिरात अध्यात्म विषयक प्रवचने आयोजित केली जातात..

 

दिनांक २० मे २४ रोजी श्री राजेंद्र प्रसाद मसुरकर ह्यांचे ‘आजचा काळ आणि भगवद्गीता’ या विषयावर प्रवचन आयोजित केले आहे. सध्याच्या अशांत जीवनात आपल्याला कशालाच वेळ मिळत नाही. माणूस सतत कशाच्या तरी मागे धावत असतो.

ह्या अत्यंत व्यस्त जीवनात शांत, समाधानी राहण्यासाठी भगवंत आपल्याला भगवद्गीतेतून कर्मयोग, ज्ञानयोग शिकवतात. माणूस म्हणून जगायचे कसे हे शिकवतात. त्यासाठी आजचा काळ आणि भगवद्गीता यावर मार्गदर्शन होणार आहे.

 

सर्वांनी या संधींचा जरूर फायदा करून घ्यावा.. श्रवणाचा लाभ घ्यावा आणि आपले जीवन उन्नत करावे. हे प्रवचन २० मे २४ रोजी सायंकाळी ५ ते ६या वेळेत होणार आहे.