उत्तम पवार स्मृतिदिनी १० रोजी रक्तदान शिबीर, गायन पार्टी स्पर्धा !

Google search engine
Google search engine

Blood Donation Camp, Singing Party Competition on Uttam Pawar Memorial Day 10!

दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गतर्फे आयोजन

मसुरे | झुंजार पेडणेकर : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेचे संस्थापक तथा कवी उत्तम पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त दर्पण प्रबोधिनी, सिंधुदुर्गतर्फे १० एप्रिलला सायंकाळी ६ वा. येथील बुद्धविहारच्या पटांगणावर जिल्हास्तरीय जयभीम गायन पार्टी स्पर्धा आयोजित केली आहे. तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात रक्तदान शिबीर होणार आहे. १० एप्रिलला सकाळी ८ ते ११ या वेळेत बुद्धविहार येथे होणाऱ्या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तर जयभीम गायन पार्टी स्पर्धेकरिता अनुक्रमे १० हजार रु.(राजेश कदम, भरणी पुरस्कृत), ७ हजार रु.(जयंत तांबे – बोर्डवे पुरस्कृत), ५ हजार रु.( नरेंद्र तांबे- कणकवली पुरस्कृत) व १,१११ रु.ची दोन उत्तेजनार्थ बक्षिसे(दिलीप कदम- भरणी पुरस्कृत) ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दर्पण प्रबोधिनीतर्फे करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी राजेश कदम ९४२३८३२६९२,आनंद तांबे ९६८९१४४६२८, सुनील तांबे ९५४५९०२३००, सुभाष कदम ९२२६३०१३७३, नरेंद्र तांबे ७५८८५८४७९३, विशाल हडकर ९०४९८१३९१६ यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.