स्वामी सेवेत जीवन सुखी आणि समृद्ध करूया!

▪️सदगुरु गावडेकाका महाराज यांचे आवाहन

मसुरे | झुंजार पेडणेकर                 :      या मठाच्या उभारणी नंतर येथील परिसर अधिक पुण्यमय झाला आहे. जीवनात कधी कुणाची निंदा, अवहेलना करू नका. रंजल्या गांजलेल्याना आपले म्हणा हा स्वामी संदेश जीवनात पाळा. सर्व धर्म समभाव या उक्तीने सर्वांना पुढे जायचे आहे. आपली संस्कृती जपा आणि देशाला पुढे घेवून जावा. स्वामी सेवेत जीवन सुखी आणि समृद्ध करूया हाच संदेश येथून न्यायचा आहे. जीवन सुखमय होण्यासाठी स्वामीनी सांगितलेली वचने जीवनात पाळा असे आवाहन प. पू . सदगुरु श्री गावडेकाका महाराज यांनी येथे केले. श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू . सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या

श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास ( रजि.)

संलग्न श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट,

या मठाचा १४ वा वर्धापन दिन सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी भक्तांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मठाच्या वतीने सद्गुरू गावडेकाका महाराज यांचा विश्वस्त साई पेडणेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी न्यासचे खजिनदार गौरव मुंज, विश्वस्त साई पेडणेकर, निशा आजगावकर, नितीन पिंगुळकर, मसदेकर गुरुजी, अंजली नार्वेकर, सौ. वाघ, श्रीकृष्ण पाटकर, सौ अमृता पाटकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सद्गुरू गावडेकाका महाराज म्हणाले, सर्वांचे सहकार्य आणि पाठिंब्या मुळे गोवा येथील मठात गुरुकुल शिक्षण पद्धतीचा शुभारंभ होतं आहे. अंतरराष्ट्रीय दर्जाचे योग भवन कुडाळ माड्याचीवाडी येथे व्हावे हा माझा संकल्प पूर्ण झाला कि या मठाचे नूतनिकरण करून भव्यदिव्य वास्तू याठिकाणी उभी करणे हा माझा संकल्प आहे. जनकल्याणसाठी अनेक उपक्रम आपण राबवत आहोत. सर्वांचे सहकार्य चांगले लाभत असल्याचे ते म्हणाले. श्रीकृष्ण पाटकर यांनी आभार मानताना मठामध्ये राबविले जाणारे विविध धार्मिक उपक्रम याबाबत माहिती दिली.तसेच गावडेकाका महाराजांना यांचे विशेष लक्ष या मठावर असून यां मठाच्या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होत आहे असे सांगितले. यावेळी सेवा न्यास खजिनदार गौरव मुंज, मसदेकर गुरुजी, यु ट्यूबर निशा आजगावकर यांनी शुभेच्छा दिल्या. मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. यावेळी श्रीकृष्ण पाटकर, विनोद लब्दे, सिद्धेश खोत, भाग्यश्री खोत, राजेश प्रभुलकर, लता प्रभूलकर, कोमल पेडणेकर, पांडुरंग गोलतकर, संतोष मसुरकर, सौ. संजना मसुरकर, साई पेडणेकर, सायली पेडणेकर, सुधीर पडेलकर, उमेश मुणगेकर, गौतम खोत, गोपाळ पालव, पुंडलिक जाधव, छाया जाधव, दादू गावडे, सीता गावडे आदी सह श्री स्वामी समर्थ मठ सेवेकरी, भक्तगण, महिला उपस्थित होत्या. आभार श्रीकृष्ण पाटकर यांनी मानले.