मात्र पोलिसांची पाठ फिरताच, येरे माझ्या मागल्या
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी — सतत ट्रॅफिक समस्या असलेल्या फोंडाघाट बाजारपेठ मध्ये वाहतूक पोलिसांची सरप्राइज व्हीजीट देऊन,वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर व नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांची कारवाई केली. त्यामुळे अवैध वाहन चालवणाऱ्या आणि युवकांमध्ये खळबळ माजली.अनेक जण मेन रस्ता चुकवून आड मार्गाने प्रवास करत आहेत.

अशीच कार्यवाही सातत्याने होऊन आडमुठ्या वाहन चालकांवर कारवाई व्हावी आणि बाजारपेठेतील रस्ता वाहतूक कोंडी मुक्त व्हावा अशी अपेक्षा पादचारी – आणि पर्याटकांमधून मधून होत आहे. अशा मोहिमांना ग्रामपंचायतीने सुद्धा सहकार्य करावे अशी अपेक्षा पोलिसांकडून व्यक्त झाली.

या मोहिमेमध्ये पीएसआय शेगडे, हेड कॉन्स्टेबल चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल घाडीगावकर, गवस, आबिटकर ,जाधव इत्यादी कणकवली विभागाचे पोलीस सहभागी झाले होते… मात्र मोहीम पूर्ण करून गाड्या बाजारपेठे बाहेर जाताच ,पुन्हा येरे माझ्या मागल्याsss प्रमाणे वाहतूक कोंडी पूर्ववत होऊ लागली. त्यामुळे आठवड्यातून एकदा अचानक ही मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.












