माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावातील गेले पंधरा वर्षे रखडलेले काम, जि.प. शाळा क्रमांक३ ते जि.प शाळा २य रस्त्याचे काम चिपळूण संगमेश्वर तालुक्याचे आमदार श्री शेखर निकम यांनी पूर्णत्वास नेले.
सुमारे ६५ लाख रुपये मजुंर करून त्या रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण करून काम पूर्ण केले.यास्तव करजुवे गावातील ग्रामस्थांनी सावर्डे कार्यालयात जाउन आमदार शेखर निकम यांचे आभार मानले. व सन्मान केला. यावेळी अजय चांदिवडे, पांडुरंग चांदिवडे, गोपिनाथ बाचिम, संतोष बाचिम, पांडुरंग वेलोडें, गोपाळ कांगणे, प्रकाश बाचिम,कृष्णा पाताडे, अनिल गोवळकर आणि सुभाष बाचिम आदी उपस्थित होते.












