“We must remember that we too lack something”
जागतिक स्वमग्नता दिनी उमा दांडेकर यांचे प्रतिपादन
रत्नागिरी : आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी आयोजित जागतिक स्वमग्नता जाणीव जागृती कार्यक्रम प्रसंगी “आपल्यातही काही तरी कमतरता आहे, हे लक्षात ठेवायला हवे असे प्रतिपादन एल. आय. सी.प्रशाकीय अधिकारी “-श्रीम. उमा दांडेकर यांनी केले. आपण स्वमग्न मुलांचा स्वीकार करायला हवा त्यांच्या कडुनही शिकण्यासारखे बरेच काही असते असे देखील त्या म्हणाल्या. मारुती मंदिर सर्कल रत्नागिरी येथे आस्थामार्फत समाजात “ऑटिझम “अर्थात स्वमग्नतेविषयी जाणीव जागृती करण्यासाठी ऑटिझमच्या लक्षणांच्या पोस्टरचे अनावरण श्रीमती दांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.त्याचे हँडबिल देखील वितरीत करण्यात आले. आस्थाच्या कार्यकर्त्यांनी स्वमग्नतेची लक्षणे,उपचार पद्धती याविषयी माहिती परिसरातील रत्नागिरीकरांना दिली. लोकांना आकर्षित करण्यासाठी पोस्टरला स्वमग्नतेचे प्रतीक निळा रंग असल्याने निळ्या फुग्यांनी सजविण्यात आले होते.आस्था स्वमग्नतेच्या क्षेत्रात मागील बारा वर्ष कार्यरत आहे.स्वमग्नतेचे निदान ते उपचार सर्व सेवा ” आस्था विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे थेरपी सेंटर, “छत्रपती शिवाजी स्टेडियम मारुती मंदिर रत्नागिरी येथे उपलब्ध आहे. या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी श्रीमती अनुराधा जोशी व श्रीमती कांचन जोग याउपस्थित होत्या. याप्रसंगी पाहुण्यांचे स्वागत चिरंजीव अल्हाद सुरेखा पाथरे यानी केले. कार्यक्रमाचे नियोजन आयोजन श्री.संकेत साळके यांच्या नेतृत्वाखाली श्रीमती संपदा कांबळे, मयुरी जाधव, सुप्रिया कांबळे, मानसी ओर्पे यांनी केले. आस्था च्या सचिव सुरेखा पाथरे,खजिनदार साक्षी चाळके यांनी उपस्थितांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली.