लोटे अपघात प्रकरणी कार चालकावर गुन्हा

 

खेड(प्रतिनिधी) मुंबई गोवा महामार्गा वरील लोटे येथील विनती
ऑरगनिक कंपनी नजीक उभ्या ट्रेलर ला पाठीमागून ठोकर देऊन अपघात केलेल्या कार चालकावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा अपघात १४ मे रोजी सकाळी ०७.१० वा च्या सुमारास घडला होता

विशाल अनंत बिर्जे रा.परेल भोईवाडा मुंबई असे गुन्हा दाखल झालेल्या कार चालकाचे नाव आहे तर या प्रकरणी ट्रेलर चालक अमोल प्रसाद पटेल सध्या रा. न्हावाशेवा, दिघोडे जि.रायगड मुळ रा.
चिलरीखुर्द, पोस्ट – कुस्परी ता. जि- सीधी राज्य – मध्यप्रदेश याने तक्रार दाखल केली आहे

 

विनती ऑरगनिक कंपनी लोटेचे बाजुला फिर्यादी यांच्या ताब्यातील ट्रेलर नंबर. एम. एच. ४६ / बी. बी / ४७३५ हा मुंबई ते गोवा जाणारे रोडचे साईडला असणारे कच्च्या रस्त्यावर विनती कंपनीमध्ये माल भरण्यासाठी उभा करुन ठेवलेला असताना सकाळी
०७.१० वाजताचे सुमारास मुंबई बाजुकडुन रत्नागिरी बाजुकडे जाणा-या वॅगनर नंबर. एम. एच. ०१/ व्हि.ए/८७७९ वरील चालक याने फिर्यादी यांचे ट्रेलरचे क्लिनर साईडचे मागील ट्रॉली व बंपर ला जोरदार ठोकरून अपघात करुन स्वताचे उजवे पायाचे गंभीर दुखापतीस व गाडीचे पुर्ण नुकसानीस कारणीभुत झाला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे