लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील भांबेड गोसावी वाडी येथील श्री साईनाथ मित्र मंडळाच्या वतीने येथील श्री साई मंदिराचा २५ वा वर्धापनदिन सोहळा २० मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त दिनांक १७ मे रोजी आणि १८ मे रोजी सायंकाळी ५ ते रात्र ११ या वेळेत साई चषक २०२४ या दिवस-रात्र अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दिनांक १९ मे रोजी सकाळी १० वाजता श्री महालक्ष्मी मंदिर भांबेड येथे मान्यवरांच्या हस्ते श्री साईनाथ मित्रमंडळाच्या टी-शर्ट चे अनावरण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर सायंकाळी चार ते सात यावेळेत महिला आणि लहान मुलांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून रात्री ८ वाजता मंडळ स्थापन कमिटी सभासद यांचा सन्मान सोहळा पार पडणार आहे .
त्याचप्रमाणे दिनांक २० मे या मुख्य दिवशी पहाटे ५ ते सकाळी ७ या वेळेत मूर्ति अभिषेक आणि काकड आरती, सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत साई प्रतिमा पालखी मिरवणूक सोहळा पार पडणार आहे. दुपारी १ ते २ साई भंडारा महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी चार ते पाच सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी ५.३० ते ६ या वेळेत हळदीकुंकू समारंभ सायंकाळी सहा ते सात प्रासादिक भजन, ७ ते ८ महाआरती, रात्री ८ वाजता ह भ प संतोष बुवा कुर्णेकर आणि मंडळ यांचा हरिपाठ आणि रात्री ९ वाजता मान्यवरांचा सत्कार सोळा व बक्षीस वितरण समारंभ होणार असून १० वाजता नमन हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष मोहन गोसावी ,सचिव संतोष गोसावी, खजिनदार सदानंद गोसावी यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थ वर्ग मेहनत घेत आहेत.











