पप्पू शेठ चिकणे यांचा आगळावेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा

लायन्स क्लब खेड सिटीच्या उपक्रमातून सामाजिक संदेश

 

खेड (प्रतिनिधी) :

रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष, खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष, माजी नगरसेवक तसेच शिवसेना खेड शहराचे प्रवक्ते सतीश उर्फ पप्पू शेठ चिकणे यांचा वाढदिवस यंदा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

लायन्स क्लब खेड सिटीच्या सहकार्याने हेड तालुक्यातील खोपी येथील सिद्धेश्वर महाराज यांच्या आनंद मठात जाऊन तेथील मुलांना जीवनावश्यक जिन्नस, फळे, भाजीपाला व खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. या उपक्रमात चिकणे यांची संपूर्ण फॅमिली सहभागी होती. यावेळी लायन्स क्लबचे प्रांतपाल डॉ. वीरेंद्र चिखले, माजी अध्यक्ष रोहन विचारे, महेश शेठ भोसले, डॉ. मरकड, परेश चिखले, संदीप मोरे तसेच मठाचे प्रमुख डॉ. मोरे सर व शिंदे सर उपस्थित होते. या प्रसंगी पप्पू शेठ चिकणे यांनी लायन्स क्लबचे मनःपूर्वक आभार मानत सांगितले की, “लायन्स क्लब सतत समाजोपयोगी उपक्रम राबवत असते, पण यंदा स्वतःच्या वाढदिवसानिमित्त अशा सेवाभावी उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्याचा खूप आनंद आहे.” यावेळी आनंद मठाच्या वतीने पप्पू शेठ चिकणे यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले व त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने या कार्यक्रमातून एक सामाजिक संदेश देण्यात आला की, वाढदिवस वा इतर शुभ प्रसंग साजरे करताना समाजातील गरजू घटकांसोबत ते साजरे केल्यास त्यातून मिळणारा आनंद हा खूपच विशेष व अमूल्य असतो.