मंडणगड पंचायत समितीची सन 2022/23 या वर्षाची आमसभा 17 एप्रिल 2023 रोजी

General meeting of Mandangad Panchayat Samiti for the year 2022/23 on 17th April 2023

प्रदीर्घ कालावधीनंतर सभेचे आयोजन नागरीकांमध्ये उत्सुकता.

मंडणगड |  प्रतिनिधि : मंडणगड पंचायत समितीच्या सन 2022/23 या वर्षाची आमसभा 17 एप्रिल 2023 रोजी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सकाळी 11.00 वाजता आयोजीत करण्यात आली आहे. या सभेचे अध्यक्षस्थान दापोली मंडणगड खेड विधानसभा क्षेत्राचे आमदार योगेश कदम हे भुषविणार आहेत. नागरीकांनी आपल्या सार्वजनीक व वैयक्तीक समस्या सोडवण्याकरिता या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन गटविकास अधिकारी विशाल जाधव यांनी केले आहे. प्रशासनाच्या विविध विभागाच्या विकासात्मक कामांचा आढावा या सभेमध्ये घेतला जाणार आहे कोव्हीड व इतर कारणांमुळे सुमारे सात वर्षे इतक्या मोठ्या प्रदीर्घ कालावधीनंतर सर्वसामान्य जनतेसमोर तालुक्याची विकासकामांचा उलगडा होणार आहे. अनेक वर्षांनी सर्वसामान्यांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी हक्कांचे व्यासपिठ उपलब्ध करण्यात आल्याने या सभेविषयी जनतेत कमालीची उत्सुकता आहे.