जगबुडी नदी होणार गाळमुक्त !

२.८४ कोटींची मान्यता; आमदार योगेश कदमांच्या प्रयत्नांना यश
खेड (प्रतिनिधी)
येथील जगबुडी नदी गाळाने भरली असून, त्यामुळे पावसाळ्यात नदी किनाऱ्यावरील भागात बसलेल्या खेड शहराला व काही गावांना पुराचा फटका बसतो. मात्र पाटबंधारे विभागामार्फत नदीतील गाळ व बेटे यासाठी सादर करण्यात आलेल्या २ कोटी ८४ लाख ९७२ रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी अलोरे कार्यालयाला तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या कामासाठी आ. योगेश कदम यांनी विशेष पाठपुरावा केला होता.
पावसाळ्यातील संभाव्य पूरपरिस्थिती नियंत्रित करणेच्या दृष्टीने पाटबंधारे यांत्रिकी विभाग आलोरमार्फत जगबुडी नदीतील गाळ काढण्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, असे आदेश पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी . २१ रोजी दिले आहेत. त्यामुळे नदीतील गाळ काढण्याचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी सुरू होणार असून, व्यापारी व नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
गतवर्षी पुराचा फटका  शहराला बसला होता. नदीच्या पाणलोट क्षेत्रात अतिवष्टी झाल्यानंतर पाणलोट क्षेत्रामधून बाहून येणान्या पाण्याच्या प्रवाह नदीपात्रातील गाळामुळे तसेच गेल्या अनेक वर्षापासून तयार झालेल्या गाळाच्या बेटांमुळे अडून पुराचे पाणी खेड शहरामध्ये तसेच आजुबाजूच्या परिसरामध्ये शिरून महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे खेड शहरातील बाजारपेठेचे तसेच आजुबाजूच्या परिसरातील मालमत्तेचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते. या परिस्थितीचा अभ्यास करून आ. योगेश कदम यांनी तातडीने बैठक घेऊन व्यापारी, नागरिक व अधिकाच्यांची मते जाणून घेतली.
खेड नगरपरिषद तसेच आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांनी व अशासकीय सेवाभावी संस्था यांनी जगबुडी नदीपात्रातील गाळ काढणे आवश्यक असल्याबाबतची निवेदने देखील जलसंपदा व महसूल विभागासह आ. कदम यांच्याकडे दिली होती. त्या अनुषंगाने आ. कदम यांनी अधिकाऱ्यांना परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पाटबंधारे क्षेत्रीय कार्यालयाला केल्या होत्या.
जगबुडी व तिच्या उपनद्यांच्या क्षेत्राची पाहणी करून क्षेत्रीय स्तरावर सविस्तर गाळ काढणेबाबतचा प्रस्ताव तयार करून जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता (यांत्रिकी) यांना सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावास त्यांनी तांत्रिक मान्यता दिली आहे.